अंगाचा थरकाप उडवणारा ‘रानटी’ चित्रपटाचा खतरनाक ट्रेलर रिलीज
( Raanti Marathi Movie Trailer 2024 )
दिग्दर्शक समित कक्कड हे एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्या चित्रपटात अनेक नवनवीन प्रयोग करत आलेले आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत असाच एक नवीन प्रयोग करत रानटी हा ॲक्शनपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.( Raanti Marathi Movie 2024 )
रानटी हा चित्रपट मराठीतला सगळ्यात मोठा ॲक्शन पट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन स्टुडिओ यांनी केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर ॲक्शन चित्रपटाचे बादशाह असणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी प्रदर्शित केला. ( Raanti Marathi Movie Trailer Release )
हेही वाचा :- प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट OTT वर दाखल !!
माणसात दोन शक्ती कार्यरत असतात एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टीकडे आकर्षित करते तर दुसरी त्याबाबतीत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते पण जेव्हा माणसातील रानटी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील चांगले गुण नाहीसे होत थैमान घालणारी माणसे दिसू लागतात याच थैमान शक्तीला आवरण्यासाठी काही जणांना रानटी व्हावे लागते.( Raanti Marathi Movie Trailer 2024 )
समित कक्कड दिग्दर्शित रानटी हा चित्रपट 22 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि या नवीन प्रयोगाचे मराठी चित्रपट सृष्टीतून कौतुक देखील केले जात आहे. ( Santosh Juvekar Movie Trailer )
हेही वाचा :- वरुण-समांथाचा लिपलॉक VIDEO Viral
रानटी या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता शरद केळकर दिसणार आहे. तर त्यांच्यासोबत संजय नार्वेकर,संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव, नयना मुखे अशी तगडी स्टार कास्ट असणार आहे. (Sharad Kelkar Movie Trailer )
‘रानटी’ या चित्रपटासाठी ऋषिकेश कोळी यांचे लिखाण, अजित परब यांचे संगीत, अमर मोहिले यांचा पार्श्व संगीत लाभल आहे . 22 नोव्हेंबरला रानटी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.
( Raanti Marathi Movie Trailer 2024 )