Navra Mazha Navsacha On OTTNavra Mazha Navsacha On OTT

नवरा माझा नवसाचा 2 चित्रपट OTT वर दाखल ( Navra Mazha Navsacha On OTT )

 

बहुचर्चित नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. या चित्रपटातील गाणी असतील किंवा डायलॉग असतील हे खूपच व्हायरल झाले होते.तब्बल 19 वर्षानंतर नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा आला होता. (Navra Mazha Navsacha 2 On OTT Platform)

Navra Mazha Navsacha On OTT
Navra Mazha Navsacha On OTT

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे साधारण बजेट हे आठ कोटी होते आणि चित्रपटगृहात मिळालेल्या प्रतिसादामुळे या चित्रपटाने फक्त सुरुवातीच्या चार ते पाच दिवसातच हे सर्व पैसे वसूल केले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.86 कोटी ची कमाई केली होती .त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2.43 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 3.55 कोटी कमाई केली होती. ( Navra Mazha Navsacha 2 Box Office Collection)

हेही वाचा :- प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट OTT वर दाखल !!

संपूर्ण बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट आता ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट तुम्हाला ॲमेझॉन प्राईम या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. याविषयी माहिती स्वतः अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. ( Navra Mazha Navsacha 2 On Amazon Prime )

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमल इंगळे, विजय पाटकर, निर्मिती सावंत, निविदिता सराफ, अलिसागर,वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर, अशी मोठी कलाकारांची फौज आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहे आणि अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे.

Leave a Reply