या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस येणार प्रेक्षकांच्या भेटीला ( Mrunal Dusanis New Serial Promo)
सध्या मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन मालिका दाखल होत आहेत. मालिकेच्या निमित्ताने अनेक कलाकार बऱ्याच वर्षानंतर मालिका विश्वात पुनरागमन करत आहेत. यामधील एक नाव म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानिस ( Mrunal Dusanis)
अभिनेत्री मृणाल दुसानिस ही लग्न झाल्यानंतर अमेरिकेला निघून गेली होती तिने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. ती परत भारतात येणार का किंवा ती मनोरंजन विश्वात परत पदार्पण करणार आहे की नाही याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. परंतु गेल्याच वर्षी मृणाल भारतामध्ये दाखल झाली आणि ती सोशल मीडियावर तिच्या गोष्टी शेअर करू लागली आणि तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये कुठेतरी एक उत्सुकता होती की लवकरच मृणाल दुसानिस मालिकेमध्ये किंवा इतर कोणत्यातरी माध्यमातून सक्रिय होईल.( Lagnanatar Hoilch Prem Promo )
हेही वाचा :- प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट OTT वर दाखल !!
अभिनेत्री मृणाल दुसानिस हिच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. नुकताच मृणाल ने तिच्या सोशल मीडियावरून तिच्या नवीन मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.’लग्नानंतर होईलच प्रेम’ ( Lagnanatar Hoilch Prem) असेल मृणालच्या नव्या मालिकेचे नाव आहे. ही मालिका स्टार प्रवाहवर 16 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.( Mrunal Dusanis New Serial )
हेही वाचा :- मला वाटलं की ४२ व्या वर्षी मला मूल जन्माला घालायचंय तर.. बाळ होण्याच्या प्रश्नावर प्रिया बापटने दिले उत्तर.
या मालिकेची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेत मृणाल सोबत ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) देखील असणार आहे. तसेच विवेक सांगळे ( Vivek Sangale) आणि विजय आंधळकर ( Vijay Andalkar) यांची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. ज्ञानदा रामतीर्थकर हिला आपण स्टार प्रवाहच्याच ‘टिपक्याची रांगोळी’ या मालिकेत पाहिलं होतं. तर विवेक सांगळे याला कलर्स मराठीच्या भाग्य दिले तू मला या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहिलं होतं आणि विजय आंधळकर हा देखील स्टार प्रवाहच्या ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होता.( Dnyanada Ramtirthkar New Serial )
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanatar Hoilch Prem) ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार स्टार प्रवाह वर संध्याकाळी सात वाजता पाहता येणार आहे . सध्या या वेळेत ‘साधी माणसं’ ही मालिका प्रसारित होत आहे . येणाऱ्या या नव्या मालिकेमुळे साधी माणसं या मालिकेची वेळ बदलण्याची शक्यता आहे. तर लग्नाची बेडी ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे.( Lagnachi Bedi Serial Go Off Air )
अभिनेत्री मृणाल दुसानिस शेअर केलेल्या या प्रोमोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट चा वर्षाव केला आहे अनेकांनी मृणाल आणि ज्ञानदा यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि मालिका पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याच्या कमेंट देखील केल्या आहेत..l
(Mrunal Dusanis New Serial Promo)