प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ चित्रपट OTT वर दाखल !!
( Phulwanti Release On OTT )
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेला फुलवंती हा चित्रपट 11 ऑक्टोबरला चित्रपट गृहात दाखल झाला आहे. यामध्ये प्राजक्ता माळी ( Prajkata Mali) हिने मुख्य भुमिका साकारली होती तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक देखिल होतं असताना दिसत आहे.
फुलवंती या चित्रपटातील गाणी आणि डान्सला देखील प्रेक्षकांनी चांगली पसंदी दिली होती. दरम्यान 3 आठवड्यानंतर मात्र बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या दोन मोठ्या हिंदी चित्रपटाचा फटका कुठे तरी फुलवंती या चित्रपटाला बसला.
फुलवंती या चित्रपटाचे शो देखील बॉक्स ऑफिसवर कमी झाले होते.
हे सर्व जरी असले तरी आता फुलवंती चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फुलवंती हा चित्रपट आता तुम्हाला घर बसल्या पाहिला मिळणार आहे.
हेही वाचा :- अभिनेत्री प्राजक्ता माळीला नवोदित कवी म्हणून ‘मसाप’चा पुरस्कार जाहीर !! ( Prajkta Mali Awarded as Poet)
कुठे आणि कसा पाहू शकाल फुलवंती चित्रपट ?
फुलवंती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाल्यावर एक महिन्याच्या आतच ओटीटी वर दाखल झाला आहे.हा सिनेमा तुम्हाला ॲमेझॉन प्राईम पाहिला मिळणार आहे.पण हा चित्रपट सध्या रेंट या ॲमेझॉन प्राईम सुविधेमध्ये आहे. याचाच अर्थ तुम्हाला जर फुलवंती हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्हाला 149 मोजावे लागतील.पण जर ॲमेझॉन प्राईम मेंबरला हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम वर मोफत बघायचा असेल तर त्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागेल.
फुलवंती या बद्दल सांगायचे झाल्यास या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्नेहल तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रसाद ओक, वैभव मांगले , ऋषिकेश जोशी यांच्या देखील चित्रपटात महत्वाच्या भुमिका आहेत.