‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रूपाली भोसले हिने घेतली नविन गाडी
Rupali Bhosale Purchase New Car
आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत संजना ही भुमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले कमी कालावधी मध्ये घराघरात पोहचली. रूपाली भोसले हिचा सोशल मीडियावर मोठा चाहतवर्ग आहे.ती तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी तिच्या फोलर्स सोबत शेअर करत असते.
हेही वाचा :- मारा किंवा मरा हा एकच रुल…. थरकाप उडवणारा रानटी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
नुकताच रूपाली भोसले हिने व्हिडीओ शेअर करत एक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.या व्हिडीओ मध्ये रूपाली तिच्या सर्व कुटुंबासोबत गाडी खरेदी करण्यासाठी गेली आहे.
रूपाली भोसले हिच्या ह्या व्हिडियो वर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान रूपाली भोसले हिने जुलै महिन्यातच नविन घर खरेदी केले होते आणि आता काही महिन्यातच तिने नविन कर खरेदी केली आहे.
हेही वाचा :- या दिग्गज कलाकारांसोबत अक्षया देवधर पुन्हा दिसणार मराठी मालिकेत
रूपाली भोसले हिने आई कुठे काय करते या मालिकेत प्रभावी खलनायिका साकारली आहे. ही मालिका 2019 पासुन स्टार प्रवाह वाहिनीवर चालू आहे .
नुकत्याच काही दिवसापूर्वी अभिनेते मिलिंद गवळी यांनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हे एक पोस्ट करून सांगीतले होते.