॥ श्री ॥
पोस्ट ऑफिस लिहिताना …
टेलिव्हिजन म्हणजे ईडियट बॉक्स अशीच सगळ्यांची एक कॉमन धारणा असते, म्हणजे सिनेमा, नाटक, वेब सिरिज लिहिणाऱ्या लेखकाला जसा मान मिळतो तसा टेलिव्हिजन लिहिणाऱ्या लेखकांना मान तुलनेने कमीच मिळतो. पण या टेलिव्हिजन ने देखिल अशा काही कलाकृती दिल्या आहेत ज्या अजुनही रसिकांच्या मनात ठाण मांडून आहेत.
या क्षेत्रात आल्यापासून मला देखील टेलिव्हिजन मध्ये आपण देखील एखादी अशी कलाकृती लिहावी जी रसिकांच्या मनात चिरकाल राहिल अशी ईच्छा होतीच. याची पहिली कसर भरून काढली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेने, सोनी मराठी वरील तब्बल साडेचार वर्ष चाललेली आणि सातशे पेक्षा अधिक भाग झालेल्या या मालिकेचा एक हिस्सा मला बनता आला यासाठी मी आयुष्यभर सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सर, प्रसाद खांडेकर यांचा ऋणी आहेच. या मालिकेने मला एक नवीन ओळख दिली आणि जगण्याचे बळ देखील दिले.
पण त्याचवेळी बाहेर लोकं स्किट लेखक म्हणुन कौतुक करायचे आणि हा फक्त रिकटच लिहितो रे, पंधरा मिनिटाच्या वरचं हा लिहुच शकत नाही, चार पंच लिहुन कोणी लेखक होतं का ? अशी चर्चा देखील करायचे. यासर्व प्रश्नांना उत्तर देण्याची मला काही घाई नव्हती, पण संधी मिळालीच तर सोडु नये या उद्देशाने मी चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होतो, आणि ती संधी मला पुन्हा आमच्या वेटक्लाउड प्रोडक्शननेच दिली, सोनी मराठी वरिल, पोस्ट ऑफिस उघडे आहे या मालिकेच्या निमित्ताने.
ही साधारण ऑक्टोबर २०२२ ची गोष्ट असेल मी मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी हा सिनेमा करून पुन्हा एकदा हास्यजत्रे मध्ये दाखल झालो होतो, पुन्हा नव्याने सर्व बस्तान बांधायचे होते आणि त्याचदरम्यान आमचे मोटे सर म्हणाले की आपण कदाचित एक नवी मालिका करणार आहोत, तू त्यात माझ्यासोबतीला राहा आणि या पोस्ट ऑफिसमध्ये माझा प्रवेश झाला.
सुरुवातीला भिती होती की आपल्याला हा डेलिसोप प्रकार जमेल का? पण नंतर कळलं की ही फक्त चाळीस भाभांचीच आहे आणि हिची ट्रिटमेंट ही वेब सिरिज सारखीच असणार आहे आणि मनात उकळ्या फुटायला लागल्या की आता आपल्याला आपल्या मनासारखा एक प्रोजेक्ट करायला मिळेल.
पण मनासारखी घडणारी प्रत्येक गोष्ट ही सोप्पी नसते, या मालिकेचा कालखंड होता हा १९९७ चा, आणि संगणकीकरण या अत्यंत महत्वाच्या आणि माहितीपूर्ण बोष्टीविषयी हे कथानक फिरत होते, त्यामुळे वर वर चा अभ्यास असुन चालणार नव्हते, शिवाय संवादाच्या माध्यमातुन देखील तो काळ जिवंत करण्यासाठी त्याचा अभ्यास गरजेचा होता, आणि मग सुरु झाला रिसर्च. आताच्या जेन झी ला वाटेल की त्यात काय, गुगल वर टाका सगळं लगेच मिळणार पण खरी गंमत तिथेच होती, शुगलकडे तिच माहिती असते जी मानवाने त्यात भरलेली असते, खरी माहिती फिल्ड वर उतरल्यावरच मिळते. म्हणजे पोस्टाची इत्यंभूत माहिती द्यायला आम्हाला निवृत्त पोस्ट मास्तर श्री रविंद्र फणसळकर यांची साथ होतीच, पण तो काळ जास्तीत जास्त खरा वाटण्यासाठी इतर माहिती सुद्धा सोबत असणे गरजेचे होतेच.
म्हणजे गुगल ने हे सांगितलं की ९७ ला माननिय देवेगौडा पंतप्रधान होते, पण त्यावेळी देश नेमका कोणत्या परिस्थितीतून जात होता हे मात्र त्याकाळातील लोकांसोबत बोलल्यावरच कळले, सोन्याचा भाव ५००० रुपये तोळा होता, पेट्रोल २६ रुपये लिटर होते पण या सगळ्याचा मध्यमवर्गीयांवर काय परिणाम होता है, प्रत्यक्षात त्या काळातल्या लोकांसोबत बोलल्यावरच कळले, सलमान चा जुडवा आला होता पण त्याच्या गाण्यांनी कॅसेट्सनी काल धुम मचवली होती है किस्से लोकांकडून ऐकुनच कळतात, शुगलवर सर्च करून नव्हे. कारण शुभल फक्त सांगेल की या सिनेमाच्या गाण्यांच्या कॅसेटची एवढी विक्री झाली पण एखाद्या जभ्शुला ती कॅसेट मिळवण्यासाठी काय तारेवरची कसरत करावी लागली ही गोष्ट ती जग्गुच सांगु शकतो.
अशा पद्धतीने एक एक गोष्ट पुढे सरकत होती, मी सोडून आमच्या टिम मधल्या सगळ्यांचाच या मालिकेवर बराच अभ्यास करून झाला होता, मी नव्याने कॅरेक्टर समजुन घेत होतो, पोस्टात होऊ शकणारे वेगवेगळे किस्से शोधत होतो. आणि त्याचवेळी कथाविस्तार व पटकथेचे नवे तंत्र देखील शिकत होतो.
ईरलास पण मनाने प्रेमळ असा गुळस्कर, भांभावलेला पोस्ट मास्तर शरद कुलकर्णी म्हणजे शकु, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील घोळ घालणारा निरगुडकर, प्रत्येक गोष्टीत गंमत शोधणारी केळकर बाई, प्रत्येक भोष्टीची मुलतः आणि तत्वतः वर्गवारी करणारा राक्षे, आणि दरवेळी नवीन गाणी व प्रेमाच्या शोधात असणारा जग्भु आणि कथेच्या अनुषंगाने येणारी इतर पात्रे या सगळ्यांचा अभ्यास करता करता आपसुकच त्यांच्यासोबत गप्पा सुरु झाल्या आणि ती पात्रच त्यांची कथा सांगु लागले.
हे प्रत्येक पात्र वेगळं तर होतच पण या प्रत्येकाचं कुटुंब त्याचं भावविश्व पण वेगळं होतं, टेलिव्हिजनच्या निमित्ताने काही नवीन पात्रांची यात भर आली, काही पात्रं कथेच्या गरजेने तयार झाली आणि या सर्व पात्रांचा एक गोतावळाच बनला.
कथा विस्तार आणि पटकथा विस्तार हे काम चालुच होते पण अचानक या मालिकेमध्ये मला संवाद लेखनाची देखील संधी मिळाली. आणि मी त्या पात्रांच्या अजुन खोलात शिरत गेलो, म्हणजे दोन पात्रं काय विषयावर बोलतील हा विचार करणारा मी हळु हळु मी त्या पात्रांचं त्या विषयावर काय मत असेल असा विचार करू लागलो, ही, प्रोसेस मला खुप शिकवणारी होती आणि आनंद देणारी देखील.
गुळस्कर कुटुंबामुळे मला वडिल मुलाचं नातं एका वेगळ्या पद्धतीने उलगडता आलं, माझ्या मनात असणारं नातं काही अंशी मला लोकांसमोर मांडता आलं, ज्याला देखील रसिकांनी पसंती दिली, आणि मी स्वतः देखील गुळस्कर आणि बाप्पाचे सिन लिहिताना खुप एंजॉय करायचो.
जभ्शु च्या निमित्ताने प्रेम या संकल्पनेवर पुन्हा नव्याने विचार करायला मिळाला आणि लिहिता लिहिता प्रेमाचे नवे पदर देखील उलगडता आले. जग्शु ने रुपालीला प्रपोज करणे आणि रुपाली पुन्हा आयुष्यात आल्यावर जग्गु ने तिला नाकारणे हे दोन प्रसंग तर मला लिहायचेच होते, आणि माझ्या नशिबाने मला ते लिहिता देखील आले.
या मालिकेचे संवाद लिहिताना सोबतीला अमोल पाटील, प्रमेश बेटकर हे सहकारी देखील होतेच, त्यामुळे त्यांच्या लिखाणाची देखील एक वेगळी झलक अनुभवायला मिळाली, आणि सचिन मोटे सरांकडुन लिखाण शिकण्याची ईच्छा देखील पुर्ण झाली अर्थात ही न थांबणारी प्रोसेस आहे, त्यामुळे अजुनही ते शिकणं चालुच आहे.
आयुष्याच्या एका काळापर्यंत काही पत्रं लिहिलेला मी आज त्या अख्ख्या सिस्टिम वर मालिका करू शकलो हे केवळ माझ्या सोबत असणाऱ्या या माझ्या लोकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच. आज खुप ठिकाणी गेल्यावर अचानक गप्पा मारताना कोणीतरी विषय काढतं की अरे मध्यंतरी पोस्ट ऑफिस नावाची छान मालिका आलेली, तेव्हा अभिमानाने उर भरून येतं आणि मी लगेच सांगतो की मी त्या मालिकेच्या लेखक टिमचा एक भाग होतो.
सगळ्याच गोष्टी नेमक्या शब्दात नाही मांडता येणार पण पोस्ट ऑफिस या मालिकेने माझा आत्मविश्वास वाढवला आणि एक समाधान देखील मिळुन दिले म्हणुन हा लेखपपंच, त्या पोस्ट ऑफिस च्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी.
आता इथेच थांबतो, पुन्हा भेटुच एका नव्या कथेसोबत.
ऋषिकांत राऊत