प्रथमेश परब याची लग्नानंतरची पहिली दिवाळी ठरली खुपच खास (Prathamesh and Kshitija Diwali Celebration 2024
मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची पाडणारा अभिनेता प्रथमेश परब ( Prathamesh Parab ) हा नेहमीच विविध कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमेश नेहमी त्याच्या सोबत संपर्कात असतो.मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींची यावर्षी लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. यावर्षी 24 फेब्रुवारीला प्रथमेश आणि क्षितिजा हे विवाह बंधनात अडकले. त्यामुळे या दोघांची ही लग्नानंतरची पहिली दिवाळी असणार होती.
प्रथमेश परब ( Prathamesh Parab )आणि क्षितिजा यांनी मात्र त्यांची पहिली दिवाळी वेगळ्या स्वरूपात साजरी करायची ठरवली होती. या दोघांनी यांची दिवाळी दिव्यांग मुलांसोबत साजरी केली. या मुलांना दिवाळी फराळ तसेच गिफ्ट देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला.
क्षितिजा हिने तिच्या सोशल मीडियावर या दिवाळी सेलिब्रेशन चे फोटो पोस्ट करत त्याला सुंदर असे कॅप्शन दिले आहे त्यात ती म्हणते आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट ही कायम special असते. त्यातुन लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हटलं तर ती अजून special व्हायला हवी.
म्हणूनच आम्ही हा दिवस special करण्याचा प्रयत्न केला Sec Day school, खारदांडा येथील मुलांसोबत.
त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड हसू,
चेहऱ्यावरची प्रचंड सकारात्मकता,
आपल्याकडे काहीतरी कमी आहे यापेक्षा आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि त्याचा सहजपणे केलेला स्वीकार त्यांच्या वागण्यातून दिसतो.””आपल्याकडे सगळं असून आपण लहानसहान गोष्टींची किती सहज तक्रार करतो ना!!
पण या मुलांकडे बघून जाणवतं, की तक्रार करण्यापेक्षाही, आयुष्यात कृतज्ञ राहण्यासाठी बरीच कारणं आहेत, फक्त ती शोधता आली पाहिजेत
जेव्हा आम्ही या मुलांना भेटलो, तेव्हा काही जण म्हणाले , अरे peter भैया , काही म्हणाले, दगडू दादा, पण त्या व्यतिरिक्त कित्येक मुलांनी सिनेमा कधी बघितलाच नव्हता. त्यांच्यासाठी आम्ही होतो, आपल्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलेले एक ताई दादा आणि खरंतर तेच पुरेसं होत. या मुलांसाठी, शाळेने, एक special दिवाळी बाजार आयोजित केला होता.”
हेही वाचा :- जुई गडकरी हिच्या त्या कृतीमुळे होतंय सर्वत्र कौतुक
मुलांनी ,पणत्यांवर सुरेख painting केलं, छान छान ग्रीटिंग कार्ड्स बनवले, रांगोळीचे रंग पॅक केलं, त्यांची विक्री केली.
बरं जितकं कौतुक या मुलांचं आहे, तितकंच त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचं देखील आहे.❤️सोनाली ताई तुमचं खूप खूप कौतुक आणि मनापासून आभार
दिवाळीच्या झगमगाटात,
दिव्यांच्या लखलखटात,
फटाक्यांच्या आतषबाजीत सुद्धा आज फार शांतता आणि प्रसन्नता जाणवतेय.❤️
हेही वाचा :- टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
तक्रारीच्या विचारांच वादळ pause झालंय आणि आयुष्याच्या रांगोळीत चैतन्यांचे रंग भरल्यासारखे वाटतं आहेत❤️❤️
#शुभ_दीपावली #The_Special_Diwali_with_special_ones” अशी पोस्ट तिने लिहिली.
दरम्यान ला पोस्टवर प्रथमेश परब यांच्या चाहत्यांनी कमेंट करत रोगांच्या या उपक्रमाचे कौतुक केल आहे तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.