अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्या खऱ्या आयुष्याबदल बरच काही
(Prapti Redkar Biography )
झी मराठी वरील “सावळ्याची जणू सावळी” या मालिकेत सावली ही मुख्य भुमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने साकारली आहे. हे पात्र कमी काळातच प्रेक्षकांना जवळच वाटू लागलं आहे.
चला तर मग पाहू अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्या विषयी जाणून घेवूया काही महत्वाच्या गोष्टी..
प्राप्ती रेडकर जन्म आणि वय ( Prapti Redkar Birthdate And Prapti Redkar Age )
अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिचा जन्म 6 जानेवारी 2001 रोजी मुंबई इथे झाला आहे.2024 नुसार प्राप्ती हिचे सध्याचे वय 23 वर्ष आहे.तिची उंची 5.4 एवढी आहे. अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्या वडिलांचे प्रवीण रेडकर आणि आईचे नाव ज्योती रेडकर असे आहे. तिला कोणीही भाऊ किंवा बहीण नाही तसेच तिचे अजून लग्न झालेले नाहिये.
प्राप्ती रेडकर शालेय आणि उच्च शिक्षण ( Prapti Redkar Eduction ) –
अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिचे शालेय शिक्षण ST Joseph High School मुंबई इथे झाले आहे. तसेच तिचे उच्च शिक्षण KC College चर्चगेट येथे झाले आहे.
प्राप्ती रेडकर छंद ( Prapti Redkar Interest ) –
अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिला लहानपणापासून डान्स आणि अभिनयाची आवड होती. तिने शालेय आणि कॉलेज जीवनात अनेक स्पर्धा मध्ये भाग घेवुन चांगले असे यश मिळवले आहे.
2021 साली तिला Kick Boxing आणि कराटे याची आवड होती. तिने यामध्ये नॅशनल गोल्ड मेडल मिळवले आहे.
प्राप्ती रेडकर मालिका ( Prapti Redkar Serial ) –
अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने ‘किती सांगायचं मला’ या मालिकेत बालकलाकार म्हणून काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. प्राप्ती रेडकर हिने ‘माधुरी मिडल क्लास’ ‘जयस्तुते’ ‘तू माझा सांगाती’ या मराठी मालिकेत देखील काम केले आहे.
तसेच नुकतीच कलर्स वाहिनीवर संपलेल्या काव्यांजली या मालिकेत तिची मुख्य भुमिका होती.प्राप्ती ने मराठी सोबतच हिंदी मालिकेत देखिल काम केलं आहे.तिने ‘उडान’, ‘पोलीस फाईल’ ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेत देखिल काम केले आहे.
प्राप्ती रेडकर चित्रपट ( Prapti Redkar Movies )
प्राप्ती हिने हिंदी आणि मराठी मलिकेसोबतच चित्रपटात देखील काम केले आहे.तिने ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ आणि फुगे या चित्रपटात काम केले आहे.
हेही वाचा – टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
प्राप्ती रेडकर गाणी ( Prapti Redkar Songs )
प्राप्ती हिने मराठी, हिंदी मालिका आणि मराठी चित्रपट या सोबतच तिची काही मराठी व्हिडीओ गाणी खुप प्रसिद्ध आहे. यामध्ये “दर्याचा राजा”, “सण नारळी पुनवेचा” “लव तू करशील का” या गाण्याचा समावेश आहे.या गाण्यांमधील बरीच गाणी तिने तन्मय पाटेकर सोबत केली आहे. दरम्यान याच काळात प्राप्ती रेडकर हिचे नाव तन्मय पाटेकर सोबत जोडले गेले होते.
प्राप्ती रेडकर इंस्टाग्राम ( Prapti Redkar Instagram)
अभिनेत्री प्राप्ती रेडकर ही सोशल मीडिया वर देखील सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम वर 59.2K Followers आहेत. प्राप्ती नियमित पणे तिच्या अकाउंट वरून चाहत्यांसोबत संपर्कात असते.
प्राप्ती रेडकर मानधन ( Prapti Redkar Net Income )Prapti Redkar Biography
अभिनेत्री प्राप्ती रेडकर ही सध्या झी मराठी वरील “सावळ्याची जणू सावळी” या मालिकेत सावली मुख्य भूमिकेत आहे.तिला या मालिकेसाठी प्रत्येक भागाला वीस हजार येवढे मानधन मिळते.
अभिनेत्री प्राप्ती रेडकर ही सध्या या मालिकेमुळे घरात घरात पोहचली.
हेही वाचा – मारा किंवा मरा हा एकच रुल…. थरकाप उडवणारा रानटी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला