या दिग्गज कलाकारांसोबत अक्षया देवधर पुन्हा दिसणार मराठी मालिकेत
अभिनेत्री अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहचली . अक्षया देवधर हिला प्रेक्षकांकडून पाठक बाई या पात्रासाठी भरभरून प्रेम मिळाले. तुझ्यात जीव रंगला ही मालिका 2016 ते 2021 अशी पाच वर्ष सुरू होती.
तुझ्यात जीव रंगला या मालिके नंतर पाठक बाई आता आपल्याला झी मराठीवर कधी पाहायला मिळणार याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती परंतु आता ही उत्सुकता संपलेली आहे आणि अक्षय देवधर हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
अक्षया देवधर आता लवकरच झी मराठीवरील एका नवीन मालिकेत झळकणार आहे. अभिनेत्री अक्षया देवधर ही झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. या मालिकेत अभिनेता तुषार दळवी आणि हर्षदा खानविलकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :- मारा किंवा मरा हा एकच रुल…. थरकाप उडवणारा रानटी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
काय आहे लक्ष्मी निवास या मालिकेची कथा ?
‘लक्ष्मी निवास’ ही कथा आहे, स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणा-या एका मध्यमवर्गीय जोडप्याची. लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी. श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचं घर नाही यावरुन झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचं घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार उत्तम फुलला.
हेही वाचा – टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
३ मुलं, ३ मुली आणि श्रीनिवासची आई इतकं मोठं कुटुंब झालं. आता दोन मुलींची लग्न बाकी आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हानं आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचं लग्न जुळवणं, मुली योग्य घरी पडतायेत ना याची काळजी असणं, घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरुन ठेवणं अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे.
कुटुंबासाठी झटताना स्वतःच्या इच्छा मागे सारत लक्ष्मी आणि श्रीनिवासला आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं आहे. या मालिकेचं लेखन करत आहे सायली केदार, तर मालिकेचे निर्माते आहेत सोमिल क्रिएशन सुनील भोसले.
हा प्रोमो सोशल मीडियावर सध्या तुफान वायरल होताना दिसत आहे. लक्ष्मी आणि निवास नावाच्या वयोवृद्ध जोडप्याची भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता तुषार दळवी साकारणार आहेत. तर त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आपल्याला अक्षया झळकताना दिसणार आहे.
दरम्यान या मालिकेच्या प्रोमो मध्ये आपल्याला एक फॅमिली फोटो दाखवण्यात आलेला आहे. त्यावरून या मालिकेत मोठी अशी स्टारकास्ट असणार आहे हे देखील स्पष्ट झालेल आहे .त्यामुळे आता ही मालिका कधी सुरू होणार ? याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालाची उत्सुकता वाढलेली आहे.