मारा किंवा मरा हा एकच रुल…. थरकाप उडवणारा रानटी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या चित्रपटाची गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा चालू आहे.या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते पण आता ही प्रतीक्षा संपणार आहे. बहुचर्चित रानटी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हा टिझर थोडया वेळातच सोशल मिडिया वर व्हायरल होताना दिसतं आहे. रानटी चित्रपटाच्या या टिझर मध्ये आपल्या अभिनेता शरद केळकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले, संतोष जुवेकर हे मुख्य भूमिकेत पाहिला मिळत आहे.
हेही वाचा – जान्हवी किल्लेकर पोहचली सुरज चव्हाण यांच्या घरी
या मुख्य कलाकारांसोबत शान्वी श्रीवास्तव, छाया कदम, सुशांत शेलार , संजय खापरे, जयवंत वाडकर , अक्षया गुरव , कैलाश वाघमारे , माधव देवचक्के, नयना मुके यांच्या देखिल महत्वाच्या भुमिका आहे.
पुनीत बालन स्टुडिओने याची निर्मिती केली आहे.
हेही वाचा :- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप अडकला लग्नबंधनात, पण लग्न मात्र केले साधेपणाने
रानटी हा चित्रपट मराठी मधील सर्वात मोठा अँक्शनपट असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.