जान्हवी किल्लेकर पोहचली सुरज चव्हाण यांच्या घरी
रील स्टार सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरला. सुरज चव्हाण विजेता झाल्यावर त्याला संपुर्ण महाराष्ट्रातुन खुप प्रेम मिळत असल्याचे पाहिला मिळतं आहे. दरम्यान सुरज सोबत बिग बॉस मराठीच्या घरात राहीले काही सदस्य गेल्या काही काळात त्याच्या गावाला जाऊन त्याची भेट घेताना दिसत आहे.
यामध्ये वैभव चव्हाण,इरिना रुडाकोवा ,धनंजय पोवार आणि पुरुषोत्तम पाटील यांचा समावेश आहे. नुकतेच बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये टॉप 6 मध्ये असलेली स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिने सुरज चव्हाण याच्या गावी जाऊन भेट
या भेटीचे फोटो सुरज चव्हाण याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहे आणि सध्या हे फोटो तुफान व्हायरल होत असताना दिसत आहे.
सुरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे दोघे देखील 70 दिवस राहून ग्रँड फिनालेमध्ये पोहचले होते. परंतु जान्हवी किल्लेकर हिने 6 क्रमांकावर असताना 9 लाख घेवून खेळ सोडला होता.
सुरज चव्हाण याने जान्हवी किल्लेकर सोबत जे फोटो शेअर केले आहे त्याला सुरज याने कॅप्शन दिले आहे “लाडकी माझी ताई”.
सुरजने पोस्ट केलेल्या फोटो वर त्याच्या फॅनने कमेंटचा वर्षाव केला आहे.