सरकार-सानिकाची पहिली भेट ठरणार खास

पहा नवी प्रेम कहाणी ‘#लय आवडतेस तू मला’ दररोज रात्री 9:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर नुकतीच ‘#लय आवडतेस तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महाराष्ट्राच्या मातीतली रांगडी लव्हस्टोरी असणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तब्बल एका आठवड्यातच सरकार आणि सानिकाने संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत. अनेक रंजक ट्विस्टमुळे चर्चेत असणाऱ्या या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे.

 

महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आता आला आहे. या आठवड्यातच सरकार आणि सानिकाची पहिली फिल्मी भेट झालेली पाहायला मिळणार आहे. या भेटीनंतर प्रेक्षकांना ‘सैराट’ची आठवण येईल. तसेच वसू आणि विनय यांचा रोमँटिक अंदाज देखील प्रेक्षकांची मने जिंकून घेईल. वसू आणि विनयच्या प्रेमाचा धागा म्हणजेच एक कडं आहे. पण आता हेच कडं सरकार-सानिकाची पहिली भेट घडवून आणेल.

सरकार-सानिकाची पहिली भेट कशी असेल? एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांच्यातला संवाद कसा असेल? याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत एक अनोखी आणि उत्कंठावर्धक कथा उलगडली जात आहे. सरकार आणि सानिका ही दोन भिन्न पात्र आहेत. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधली ही पात्र असली तरी दोघांचा एक ऑरा आहे. कथानकाला गावरान बाज आहे. प्रेक्षकांना आपलंसं वाटणारं हे कथानक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये मालिकेची क्रेझ चांगलीच वाढत आहे.

 

‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेबद्दल बोलताना सानिका मोजर म्हणाली,”आमच्या जोडीला इतकं प्रेम दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे खूप-खूप आभार. या लव्हस्टोरीमध्ये अजून अनेक ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळणार आहेत. आम्ही कसे भेटलो, कसे चिडलो, कसे हसलो कसे रुसलो…

आणि पुढे या लव्हस्टोरीमध्ये अजून काय-काय होणार आहे? दोन गावांमधले मतभेद कसे सुटणार आहेत? ते त्यांच्यावर कसे मात करणार आहेत? हे सगळं बघायला मिळणार आहे. त्यामुळे दररोज न चुकता रात्री 9:30 वाजता आमची मालिका नक्की पाहा”.

 

तन्मय जक्का म्हणाला,”सानिका-सरकारच्या जोडीवर आणि मालिकेवर प्रेम करत असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप-खूप आभार. प्रेक्षक आमची मालिका खूप मनापासून पाहत आहेत याचा आनंद आहे. मालिकेच्या आगामी भागात अनेक ट्विस्ट येणार आहेत. आमची प्रेमकहाणी लवकरच अजून छान पद्धतीने फुलणार आहे”.

Leave a Reply