कोण आहे अभिनेत्री निम्रत कौर ? खरंच निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा झाला आहे का ?

 

बॉलीवूड मधलं सर्वात ग्लॅमरस कपल म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय. मात्र गेल्या काही काळात या दोघांच्या नात्यांमध्ये दुरावा आल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे. यामध्येच अभिषेक बच्चन यांचे दसवी या चित्रपटात दरम्यान एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू होतं अशी चर्चा सर्वत्र जोर धरू लागली आहे.

हे कथित अफेअर अभिनेत्री निम्रत कौर ( Nimrot Kaur ) हिच्या सोबत सुरू असल्याची सध्या चर्चा आहे.दरम्यान अशी देखील चर्चा आहे की अभिषेक बच्चन अभिनेत्री निम्रत कौर ( Nimrot Kaur ) हिला डेट करत होता आणि या दोघांचा साखरपुडा देखील झाला आहे.

   ज्या अभिनेत्री मुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यांमध्ये दुरावा आला आहे असं म्हटलं जातंय ती अभिनेत्री म्हणजेच निम्रत कौर ( Nimrot Kaur ) नक्की आहे तरी कोण ? निम्रत कौर ( Nimrot Kaur ) हिचा जन्म 13 मार्च 1982 रोजी राजस्थान मधील पिलानी या गावात झाला.

तिचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. या कारणामुळे तिचे देशातील विविध भागांमध्ये शालेय शिक्षण झाले आहे.1994 काश्मीरमध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यामध्ये तिचे वडील शहीद झाले.

   निम्रत कौर ( Nimrot Kaur ) सुरुवातीला प्रिंट मॉडेल म्हणून काम केले त्यानंतर तिने ‘बगदाद वेडिंग’ ‘ऑल अबाउट वुमन’ आणि ‘रेड स्पॅरो’ अशा नाटकांमध्ये देखील सुनील शानबाग आणि मानव कौल या दिग्दर्शकासोबत काम केले. कॉलेज मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर ती अभिनय क्षेत्रात तिचे नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आली तिने अनेक टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये देखील काम केलं.

मात्र तिला सर्वात आधी हॉलीवुड मधील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. वन नाईट विथ किंग हा तिचा पहिला इंग्रजी चित्रपट होता.

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या पेंडलर्स या चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने लंच बॉक्स, अक्षय कुमार सोबत एयरलिफ्ट, दसवी या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

निम्रत कौर ( Nimrot Kaur ) हीचे नाव याआधी देखील माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्याबरोबर जोडण्यात आलं होतं. एकेकाळी निम्रत कौर आणि रवी शास्त्री यांच्या अखेरची चर्चा होती परंतु दोघांनीही आपल्या नात्याचा इन्कार केला होता.

   दरम्यान अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर ( Nimrot Kaur ) यांनी सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेला कोणताही दुजोरा दिलेला नाही. अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची बातमी आणि निम्रत कौर(Nimrot Kaur ) बरोबर अभिषेक बच्चनचा झालेला साखरपुडा या सर्व अफवा आहेत की यात काही सत्यता आहे हे येत्या काळात सर्वांना कळेलच.

Leave a Reply