‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुन सोबत श्रद्धा कपूर दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
पुष्पा चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता पुष्पा 2 या चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहचलेली पाहायला मिळत आहे. पुष्पा हा चित्रपट अल्लू अर्जुन याचा बहुचर्चित चित्रपट आहे. पुष्पा 2 या चित्रपटाविषयी गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळी माहिती सोशल मीडियावर येत आहे.
ज्यावेळी पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यावेळी ‘उ अंटवा’ या गाण्याची भरपूर चर्चा झाली होती. समंथा आणि अल्लू यांचा डान्स प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.
पुष्पा 2 या चित्रपटात आता अल्लू सोबत आयटम सॉंग करताना कोणती अभिनेत्री दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटात देखील समंथा आणि अल्लू यांचाच डान्स पाहिला मिळेल असा चाहत्यांचा अंदाज होता. पण तसे घडणार नाहीये.
पुष्पा 2 या चित्रपटात अल्लू सोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर आयटम सॉंग करणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रद्धा हिच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे बोलले जात असले तरी त्याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान पुष्पा 2 द रुल हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू सोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना पुन्हा मोठ्या पडद्यावर आपल्याला मिळणार असून. फहाद फाजिलही पुन्हा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे सुकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.