स्त्रीत्वाच्या सन्मानाची कथा,कुक्कुरासुर वधाची गाथा 24 आणि 25 ऑक्टोबर रात्री 9.00 वा. आपल्या कलर्स मराठीवर!

 

‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत तुळजाई महात्म्यातील कुक्कुरासुर वधाची महागाथा येत्या आठवड्यात उलगडणार आहे. असुरांनी पळवलेल्या बाळाच्या शोधासाठी अनुभूती देवीची आराधना सुरू करते. तिच्या आराधने दरम्यान कुक्करासुराची नजर तिच्यावर पडते. तो तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे अनुभूती देवीला आर्त साकडे घालते.

 

देवी प्रकट होते,मात्र मायावी कुक्कुरासुराला नमवने हे मोठे आव्हान तिच्यासमोर उभे राहते.ज्यात कुक्कर बिलोरी रत्नाच्या सहाय्याने वेगवेगळी रुपे धारण करतो. देवी कुक्कुरासुराचा वध कसा करते याची ही भक्त रक्षणाची महागाथा या आठवड्यात उलगडणार आहे.

 

देवीने कुक्करासुराचा निपात करताना अनुभूतीला जगण्यासाठी लढण्याची दिलेली प्रेरणा आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणा ठरेल.

 

‘आई तुळजाभवानी’ही मालिका सध्या घराघरात आवर्जून पाहिली जाते.आई तुळजाभवानीची ही भक्तरक्षणाची गाथा परिस्थितीशी,वाईट शक्तींशी लढण्याचे बळ देणारी आहे.त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढता आहे. आई तुळजाभवानीच्या गाथेतला हा कुक्कुरासुर वधाचा हा भाग विशेष ठरणार आहे.

पहा आई तुळजाभवानी कुक्कुरासुर वधाची गाथा 24 आणि 25 ऑक्टोबर रात्री 9.00 वा. आपल्या कलर्स मराठीवर!

Leave a Reply