सुरज चव्हाण ला केदार शिंदे यांनी दिली एक अमूल्य भेटवस्तू, व्हिडिओ पाहून नेटकरी देखील झाले भाऊक

 

रील स्टार आणि बिग बॉस मराठी सिजन 5 चा विजेता सुरज चव्हाण सध्या सर्वत्र चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच सूरजने आपला वाढदिवस साजरा केला या वाढदिवसासाठी सुरज खास मुंबईमध्ये आला होता. मुंबईमध्ये आल्यावर त्याने सर्वात आधी भेट घेतली ती म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे यांची.

त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सुरज चव्हाण याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सुरज याचे सर्वच चाहते आणि नेटकरी भारावून गेले आहेत.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरज चव्हाण याला त्याच्या वाढदिवसानिमित्त खास भेटीचे आमंत्रण दिले होते. सुरज चव्हाण जेव्हा केदार शिंदे यांच्या घरी पोहचला तेव्हा त्याने केदार शिंदे यांना सर्वात प्रथम घट्ट मिठी मारली आणि नंतर त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.

 

केदार शिंदे यांनी देखील त्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि एका बापाप्रमाणे त्याला घट्ट मिठी मारली.सुरज याला त्याच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदे यांनी खास भेटवस्तू देखील दिली. आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की केदार शिंदे यांनी सुरज ला तीन वस्तू दिल्या.

 

यामध्ये त्यांनी सुरजला देवाच्या पादुका भेट म्हणून दिल्या. या पादुका पाहिल्यानंतर सुरजच्या चेहऱ्यावरील आनंद खरंच पाहण्यासारखा होता.

सुरज चव्हाण आणि केदार शिंदे यांचा हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी आपल्या भावना कमेंट द्वारे व्यक्त केल्या आहेत. यामध्ये एकाने लिहिलं आहे की “एका गरीब मुलाला मोठा होताना बघून खूप आनंद होतोय मला. देवाने पाठवले आहे केदार सर. असच तुझ्या आयुष्याच्या वाटेवर चांगली माणसं मिळू दे तुला आणि खूप मोठा हो”

 

आणखी एकाने लिहिलं आहे की “आज जे पण काही आहे ते केदार शिंदे साहेबांमुळे गुरु बनवून ठेव. खूप पुढे जाणार सुरज भावा आयुष्याचं सोनं कर”

एकाने लिहिलं आहे की “केदार सर शब्द कमी आहेत तुमच्यासाठी एका गरीबाच्या मुलाला एवढा मोठा आधार दिलात ”

 

Leave a Reply