या सुंदर जीवनाचा निरोप घ्यायचाच आहे…अभिनेत्रीच्या अश्रूंचा बांध फुटला

 

‘स्टार प्रवाह’ वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सावनी अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असते.
तिने ‘स्टार प्रवाह’ वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तिने उत्कृष्ट खलनायिका साकारली आहे. ही खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसत आहे.

नुकतीच अपूर्वा हिने वडिलांच्या आणि भावाच्या आठवणीत तिच्या इंस्टाग्राम वरून एक पोस्ट केली आहे. अपूर्वा काही दिवसापूर्वी हरिहरेश्वरला गेली होती. त्या ठिकाणी तिने तिच्या वडिलांच्या आणि भावाच्या अस्थी विर्सजन केल्या. तिथं गेल्यावर अपूर्वा खूप भावूक झाली होती.

हरिहरेश्वर येथील काही फोटो शेअर करत अपूर्वा नेमळेकरने लिहिलं आहे की “सर्वांनाच माहिती आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे…प्रत्येकाला एक ना एक दिवस या सुंदर जीवनाचा निरोप घ्यायचाच आहे…आणि या एकमेव मिळालेल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला लाभलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचा निरोप द्यायला (detachment) हे कोणाला जमलंय? माझा हा केविलवाणा प्रयत्न सुरुच आहे…त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा त्याच वळणावर फिरून आले.’

 

‘श्री. क्षेत्र हरिहरेश्वर (कोंकण दक्षिण काशी) ही तिचं जागा जिथं मी माझ्या बाबांचं आणि भावाचं अस्थी विसर्जन केलं होतं आणि त्याचं ठिकाणी त्या अथांग सागरावर पुन्हा एकदा उभं राहिल्यावर थंड पाण्याचा स्पर्श जेव्हा झाला तेव्हा जणू असं वाटलं की पप्पा आणि ओंकारला घट्ट मिठी मारली आहे. आणि आज या अथांग सागरकिनारी दाटून आलेला ढग सुद्धा बरसला, त्याचं सोबतच दाटून आलेल्या मनाचा सुद्धा डोळ्यातून बांध फुटला…आणि मी मनसोक्त रडले…

 

आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळया भावना आपण अनुभवतो, शिकतो, अंमलात आणतो…परंतू detachment ही एकमेव अशी भावना आहे की ते कोणी शिकवतं नाही. त्याचा शोध आपल्याला स्वतःच घ्यावा लागतो…असो detachment जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असाच सुरू राहील. परंतू जेव्हा जमेल तेव्हा यां दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावं…म्हणजे मन हलक होतं…मी, पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने…लवकरच…’ अशी भावुक पोस्ट अपूर्वा हिने लिहिली आहे.

तिच्या ह्या पोस्ट वर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिला आधार देण्याचे काम केले आहे.

Leave a Reply