दुसऱ्या आठवड्यातही ‘येक नंबर’चा बोलबोला

 

गेल्या अनेक महिन्यांपासून ‘येक नंबर’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. अनेकांना हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याचे वाटले होते. अखेर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मिळाले असून राज ठाकरे यांची विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट आहे.

 

सिनेमाची कथा, कलाकार, चित्रीकरण स्थळे, भव्यता या सगळ्याचे सध्या जोरदार कौतुक होत आहे. चित्रपसृष्टीतील अनेक कलाकार, मान्यवर, समीक्षकांकडून या चित्रपटाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया आल्यानंतर आता प्रेक्षकवर्ग ही या चित्रपटावर भरभरून प्रेम करत आहेत.

 

राजेश मापुस्कर यांनी पहिल्यांदाच अशा धाटणीचा चित्रपट बनवल्याने अनेकांनी त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या भव्यतेचे, कधीही मराठीत न बनलेला असा हा चित्रपट, अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर महेश मांजरेकर, भरत जाधव, साजिद खान, फराह खान, वंदना गुप्ते, आशुतोष गोवारीकर, संजय जाधवअशा अनेक मान्यवरांनही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

 

मराठी चित्रपटातील ‘येक नंबर’ हा सर्वोत्तम सिनेमा असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही अनेकांनी केले आहे. गाणी, कथानक, कलाकार अशा सगळ्याच गोष्टी ‘येक नंबर’ आहेत.

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटात धैर्य घोलप आणि सायली पाटील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला निर्मात्या आहेत.

 

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, ”माऊथ पब्लिसिटीचा काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव काही दिवसांपासून आम्ही घेत आहोत. लोकांचा वाढता प्रतिसाद, मनापासून दिलेले आशीर्वाद, या सगळ्याच फिलिंग एकदम ‘येक नंबर’ आहेत. लहान मुलंही चित्रपटाबद्दल भरभरून बोलतात, तेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपण पुढच्या पिढीत आशावाद रूजवत आहोत, असं वाटतं.

मुळात आपली कलाकृती प्रेक्षकांना आवडतेय. आपल्या प्रेक्षकांना काहीतरी भव्य द्यायचे, असे खूप मनात होते. परंतु या चित्रपटाची भव्यता एवढी होईल, याची जराही कल्पना नव्हती. यासाठी मी सगळ्या टीमचे आभार मानेन. प्रेक्षकांचेही मनापासून आभार.’’

Leave a Reply