स्वप्न, शोध, स्वार्थ याभोवती फिरणाऱ्या ‘गारुड’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

 

स्वप्न, शोध, स्वार्थ यासाठी माणूस आयुष्यभर काहीतरी शोधत असतो. या तीनही गोष्टी माणसाचा शोध कधीच थांबवू शकत नाहीत. हा यातील काही शोध हे कल्पलेल्या जादुई स्वप्नांचे असतात तर काही आत्मशोधासाठी असतात, काही साधेसरळ, असामान्य तर काही अगम्य. अशा स्वप्नांच्या शोधाच प्रत्येकाच्या मन, मेंदूवर ‘गारुड’ असतं.

 

हे शोध हळूहळू उलगडू लागलेत. कारण ‘गारुड’ चित्रपटाच्या ट्रेलरने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शोधाच्या वाटेत हरवलेलं हे नेमकं गारुड काय असेल याची छोटीशी झलक ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. एकूणच या चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढविली आहे.

 

गारुड चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक गुपित लपलेली पाहायला मिळत आहेत. सटवाईने जे नशिबात लिहिलं आहे ते घडतंच, असं म्हणत चित्रपटात या पात्रांबरोबर नेमकं काय काय घडलं हे पाहायला मिळतंय. सूडाची भावना, सत्य-असत्याचा शोध, दडलेली अनेक रहस्ये आणि माणसातलं हरवलेलं माणूसपण हे सारं २.३८ मिनिटाच्या या ‘गारुड’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

 

अखेर मन, मेंदूवर बसलेलं हे गारुड सुटणार का?, हे मात्र २५ ऑक्टोबर पासून कळेल. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी, दमदार अभिनेते शशांक शेंडे यांसह पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे या कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.

 

‘किमयागार फिल्म्स एल एल पी’ आणि ‘ड्रीमव्हीवर’ निर्मित आणि ‘सनशाईन स्टुडिओ’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निर्माते ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी केली असून सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोद चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोराम या निर्मात्यांनी बाजू सांभाळली आहे.

 

दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे याचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित आहे. चित्रपटातील रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोराम यांनी संभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताबरोबरचं पार्श्वसंगीत हे वाखाणण्याजोगे आहे.

ही पार्श्वसंगीताची धुरा संकेत पाटीलने संभाळली आहे. येत्या २५ ऑक्टोबरपासून गारुड हा चित्रपट महाराष्ट्रातील काही निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply