आली समीप लग्नघटिका! अभिषेक अन् दुर्गाचा शाही लग्नसोहळा
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘दुर्गा’ आता एका रंजक वळणावर पोहोचली आहे. सध्या मालिकेत दुर्गा आणि अभिषेकच्या लग्नाचा ट्रॅक सुरू असून, सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. या आनंदाच्या क्षणीही दुर्गा अस्वस्थ आहे. दुर्गा अभिषेकला एक महत्त्वपूर्ण व्हॉईस नोट पाठवून आपल्या खऱ्या ओळखीचा खुलासा करते. हा निर्णय तिच्यासाठी मोठी जडणघडण निर्माण करतो.
व्हॉईस नोट पाठवल्यानंतर दुर्गाला वाटते की, तिच्या मनाचा भार हलका झाला आहे परंतु त्याच वेळी अभिषेकचा मोठा भाऊ ती व्हॉईस नोट ऐकतो आणि दुर्गाला रिप्लाय देतो. त्यामुळे दुर्गाला समजते की, तिच्या आयुष्यात आणखी मोठे वळण येणार आहे. पुढे काय घडणार, दुर्गाचे सत्य कसे उघड होणार आणि त्याचा परिणाम कसा होणार? हे प्रेक्षकांसाठी पाहणे रोमांचक ठरणार आहे.
रूमानी खरे दुर्गा मालिकेतील नव्या ट्रॅक विषयी म्हणाली,”लग्नासाठी दुर्गा खूप एक्सायटेड आहे. खरं सांगायचे झाले तर तिला वेळच मिळालेला नाही कारण तिच्या नशिबात इतकी संकटे आली आहेत. सर्वात आधी तिला समजले की, अभिषेक हा दादा साहेबांचा मुलगा आहे नंतर ते मान्य करणे, त्याच्यापासून लांब जाणे आणि मग त्याचा ॲक्सीडंट होणे. तेव्हा तिला लक्षात आले की, आपण काही ही केले तरी याच्यापासून दूर नाही जाऊ शकत आहे.
दुर्गा आणि अभिषेक यांचे सुरळीत होताच आईसाहेबांनी डिक्लेर केले आम्ही तुमचे लग्न लगेच लावून देतो. त्यामुळे हे लक्षात यायलाच तिला खूप वेळ लागला आहे. दुर्गा ही अभिषेक वर प्रचंड मनापासून प्रेम करते तरी पण कुठेतरी हा प्रश्न आहे की, तो दादासाहेबांचा मुलगा आहे आणि आपण लग्न करुन त्याच घरात जाणार आहोत. ज्या घराचा आपण नायनाट करण्याचे ठरवले आहे.. लग्नासोबत दुर्गाच्या डोक्यात आईचा पण विचार आहे. आईला सांभाळणे ही शेवटी तिची जबाबदारी आहे.
लग्नाच्या या सोहळ्यात दुर्गाचे मामा मामी तिच्यावर रागावून तिला सोडून गेले आहेत. यात सगळ्यात महत्वाचे दुर्गाला लग्नाच्या अगोदर तिचे खरे सत्य अभिषेकला सांगायचे आहे. दुर्गा अभिषेकला खर सत्य सांगेल का ? नवीन कोणते वळण आता येणारं तसेच आतापर्यंत दुर्गा ही फक्त सुडाचा विचार करत होती. आता दुर्गाला लग्नानंतर दादासाहेब, आईसाहेब यांचा पण विचार करावा लागणार पासून दुर्गा मालिकेत आता अजून कोणते नवीन फाटे फुटणार आहेत हे पाहाणे महत्वाचे ठरले”.
‘दुर्गा’ ही मालिका आता एका टर्निंग पॉईंटवर येऊन ठेपली आहे, जिथे दुर्गाच्या सत्याचा प्रभाव तिच्या आणि अभिषेकच्या नात्यावर कसा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुर्गा आणि अभिषेक यांचा लग्नसोहळा प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.