ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या गायिकेचा जीवनप्रवास शिवाली परबद्वारे ‘मंगला’ चित्रपटातून उलगडणार मोठ्या पडद्यावर

सध्या सर्वत्र महिला सुरक्षिततेचे प्रमाण काहीस कमी झालेलं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात व भारतात अनेक भागांमध्ये महिलांचे होणारे शोषण, अत्याचार, बलात्कार याचे अनेक प्रकार उघडकीस आले. एका मागोमाग महिलांची सुरक्षितता भंग करणाऱ्या घटना समोर आल्यानं नागरिकांमध्ये ही काळजीच वातावरण पाहायला मिळालं. मात्र हे घाणेरडे विचार आत्ताचे नसून पूर्वीपासूनचे असल्याचं एक हुबेहूब उदाहरण म्हणजेच मंगला. सूड उगवण्यासाठी कशाचीही पर्वा न करता केलेल्या ऍसिड हल्ल्याची घटना म्हणजेच मंगला.

बऱ्याच दिवसांपासून एका पाठमोऱ्या बसलेल्या गायिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता आणि त्याखाली मंगला असं नाव येत होतं. मात्र ही व्यक्ती कोण आहे?, मंगला हे प्रकरण नेमकं काय आहे यापासून सारेच वंचित होते. आता प्रेक्षकांच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

कारण लवकरच सत्य घटनेवर आधारित आणि भयावह घटनेतून वाचलेल्या ‘मंगला’ या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकतंच मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी चित्रपटाचे पोस्टर अनावरण झाले असून मंगला ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवाली परब साकारणार असल्याचं समोर आलं आहे.

आजवर शिवालीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता शिवाली एका वेगळया भूमिकेतून मंगला या चित्रपटातून मोठा पडदा गाजवायला सज्ज होत आहे.

मंगलावर झालेला ऍसिड अटॅक आणि त्या कठीण परिस्थितीशी तिने दिलेली झुंज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच या ऍसिड अटॅक संबंधित कोणताही कायदा त्याकाळी नसल्याने योग्य तो न्याय न मिळाल्याने या लढ्याचा सामना मंगलाने कसा केला हे पाहणं रंजक ठरेल.

‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मंगलाची ही खरीखुरी कथा

Leave a Reply