सारं काही तिच्यासाठी’ मालिकेला निरोप देताना खुशबू तावडेने केले नव्या उमाचे स्वागत !
गेले वर्षभर ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडत आहे कारण मालिकेत उमाची भूमिका साकारणारी खुशबू तावडे म्हणजेच उमाई मालिकेला निरोप आहे. याला कारण ठरलंय खुशबूकडे असलेली एक गुड न्यूज. खुशबू पुन्हा एकदा आई होणार आहे. प्रत्येक स्त्री प्रमाणे खुशबूने आपला गरोदरपणाचा ७ महिन्याचा प्रवास काम करत पूर्ण केला. खुशबू कडून ऐकूया तिचा हा प्रवास कसा होता आणि मालिकेला निरोप देत असताना तिच्या मनात काय भावना आहेत.
उमाचा मालिकेतला प्रवास कसा होता?
उमा माझ्या हृदयाच्या खूप जवळची भूमिका आहे. झी मराठी सोबत काम करण्याची खूप वर्षापासूनची इच्छा ‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेने पूर्ण केली. २०२३ जुलै मध्ये ह्या मालिकेच चित्रीकरण सुरु केले होत आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी मला प्रचंड प्रेम दिलं. ह्याचसोबत मला एक वेगळा प्रेक्षक वर्ग लाभला. उमा आणि ही मालिका माझ्या हृदयाच्या जवळ राहील. मालिकेतली खास आठवण सांगायची झाली तर ते म्हणजे आपले सण, जितके सण आहेत तितके ह्या मालिकेत आणि सेट वर आम्ही साजरे केले. गंमत अशी की काही मालिका कधी- कधी आधी शूट करतात पण आमचं नेमकं ज्यादिवशी तो सण आहे त्या सणाच्या दिवशीच आम्ही शूट करायचो. सेट वरती वेगळीच ऊर्जा असायची.
२. खास कारण आहे मालिकेला निरोप देण्या मागचं ?
अतिशय खास कारण आहे की मी उमाला आणि मालिकेला निरोप देत आहे. खरंच गुडबाय कारण खूप छान कारणांनी बाय बोलतेय. मालिकेमुळे मला उमाई म्हणून ओळख मिळाली आणि आता ह्या उमाईचा खऱ्या आयुष्यात आईची भूमिका आणि कर्तव्य सांभाळायची वेळ आहे आणि माझा ८वा महिना सुरु आहे.
३. ह्या काळात शूटिंगचा अनुभव कसा होता ?
‘सारं काही तिच्यासाठी’ शूटिंग करण्याचा अनुभव अदभूत होता. सुरवातीला मला माहिती नव्हतं की हा प्रवास कसा असणार आहे. कारण सगळं नवीन होतं माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी नाहीतर प्रोडक्शनसाठी ही, पण मी स्वतःला एक मंत्र समजावलं होता की आजचा दिवस आणि आजचा क्षण हा जास्त महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस नव्याने सामोरे जायचं आणि काम करायचं. शूट करताना मला माझ्या क्षमतेची जाणीव झाली. ह्या ८ महिन्यांच्या प्रवासात एक नवीन खुशबु सापडली आणि मला ह्यासाठी प्रोडक्शन आणि झी मराठीचे खूप खूप आभार मानायचे आहेत. जसं ही बातमी मी माझ्या घरच्यांना सांगितली त्यांना जितका आनंद झाला तितकाच माझ्या झी मराठीच्या कुटुंबाला सुद्धा झाला. प्रत्येकानी उत्तम प्रकारे मला प्रतिसाद दिला, हिम्मत वाढवली.
४. जेव्हा मालिकेच्या टीमला कळवले ?
सगळ्यात आधी मी झी मराठी प्रतिनिधींशी बोलले ही बातमी द्यायला. मी त्यांना विचारलं आता काय आणि आता कसं करूया. तेव्हा त्यांनी मला एका वाक्यात उत्तर दिलं, “कि काय करायचं, कसं करायचं ते तू आमच्यावर सोड, तू फक्त तुझी प्रेग्नंन्सी एन्जॉय कर, बाकी सगळं आपण सांभाळून घेऊन. प्रोडक्शन मध्ये स्मिता ताई आहेत त्या सेटवर भेटायला आल्या आणि भेटून मला अभिनंदन करून सांगितले की आता फक्त स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्यायची आंनदी राहायचं, पौष्टिक खायचं, काही लागलं कुठच्या तर आम्हाला कळावं, बाकी सगळं आपण सांभाळून घेऊ. तर हा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा होता. पूर्ण टीम, डायरेक्टर सर , सह कलाकार, कॅमेरा मागची आमची टीम सर्वानी खूप छान साथ दिली म्हणून हा ८ महिन्यांचा प्रवास छान पार पडला. मी आयुष्यभर झी मराठी आणि ‘सारं काही तिच्यासाठी ‘ च्या पूर्ण टीमची ऋणी राहीन.
५. नवीन उमासाठी काय स्पेशल मेसेज ?
पल्लवी वैद्य, नवीन उमाची भूमिका साकारणार आहे. मला प्रचंड आनंद होतोय की पल्लवी सारखी एक उत्तम कलाकार ही भूमिका साकारणार आहे. माझी कायम ह्या मालिकेसाठी ही इच्छा आहे की मालिकेचा पुढचा प्रवास सुंदर होऊ दे कारण मला ‘सारं काही तिच्यासाठी’ ने भरभरून दिले आहे. जरी मालिकेला मी आता निरोप देत असली तरीही मालिकेवर माझा तितकाच जीव असणार आहे. मला पल्लवीचे मनापासून आभार मानायचे आहेत.
*मी पुन्हा एकदा लास्ट टाईम उमा म्हणून कृतज्ञतेने साइन ऑफ करेन. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहू दे. पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ दररोज संध्या. ६.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*