ओवी आणि निशीच्या नशिबात संसाराचं सुख लिहिलंय का ?
‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशीच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित केली आहे. पार्टीत नीरज आणि निकिता सतत एकमेकांच्या सोबत आहेत. हे पाहून निशीला एकटं वाटतंय. आपण ह्या वातावरणात मिसफीट आहोत असा कॉम्प्लेक्स तिला वाटतोय. निशी एका कोपऱ्यात जाऊन दादा आणि आईच्या आठवणीने रडते. उमाला काहीतरी जाणवतं आणि ती रघुनाथला सांगते.
माझं मन सांगतंय निशीला कसला तरी त्रास होतोय. उमाच्या सांगण्यावरून रघुनाथ निशीला फोन करतो. निशी फोन बघून स्वत:ला सावरते आणि सांगते की माझ्या स्वागतासाठी इकडे मोठा समारंभ ठेवलाय.तरीपण निशी काहीतरी लपवतेय असं उमाला वाटतंय. चारुची घरातली लुडबुड ही वाढलेय. त्यामुळे मंजू आणि लाली मध्ये भांडणं सुरु झालेत आणि त्यावेळी लाली ओवीला त्यासाठी जबाबदार धरते.
नीरज बिझनेसमध्ये नवीन असल्याने तो त्यात पूर्णपणे व्यस्त आहे. निशीकडे आपलं दुर्लक्ष होतंय ह्याची त्याला जाणीव आहे पण त्याचाही नाईलाज आहे. निशीला सुद्धा त्याची ओढाताण दिसतेय म्हणून तीची नीरजकडे कसलीही तक्रार नाही.
खरंच काय लिहलंय ओवी आणि निशीच्या नशिबात? त्यांना संसार सुख मिळेल का? बघायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ दररोज संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.