आकाश आणि वसुचे नातं कुठच वळण घेईल ?
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत वसूच्या आग्रहाखातर आकाश सुशीला आणि सुधीरसोबत (वसूच्या आई बाबांबरोबर) डिनरला गेले असताना आकाशाला वसूच्या संगीताच्या कौशल्याबद्दल कळतं आणि आकाश गाणं ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो, वसुंधराही आकाशची इच्छा पूर्ण करते. डिनर नंतर, आकाश आणि वसू घरी परतत असताना जोरदार पाऊस आणि वादळामुळे ते अडकतात.
तिथे एक व्यक्ती वसूची छेड काढण्याचा प्रयत्न करतो. पण आकाश त्याला चांगलंच धडा शिकवतो. इकडे वसूला आकाशचं एक वेगळं रूप दिसतं. पावसामुळे रस्ता बंद झाल्याने ते वसूच्या आई बाबांच्या घरी जातात.
तिथे वसूचे बाबा वसूला संपत्तीच्या कागदांबद्दल कळेल म्हणून घाबरतात. पण वसुच्या हाताला तो कागद लागतो तेव्हा समजत की बाबांनी सगळी संपत्ती बनीच्या नावावर केली आहे.
आता आकाश आणि वसुचे नातं कुठच वळण घेईल ? हे जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.