कर्म हेच अंतिम सत्य! अशाच एका सत्याचा उलगडा होणार ‘काकुळ’ या रहस्यमय चित्रपटातून
सध्या सर्वत्र कौटुंबिक, र चित्टांची चलती असलेली पाहायला मिळत आहे.शातच प्रेक्षर्ग रहस्यमय चित्रपटांना मिस करत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची हिचं इच्छा लवकरचं पूर्ण होणार आहे, कारण एक नवाकोरा रहस्यमय, हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. काकुळ असे या चित्रपटाचे नाव आहे. खून, अपहरण आणि बदला याचे चित्रण चित्रपटात केले असल्याचं समोर आलेल्या काकुळ या चित्रपटाच्या पोस्टरवरून दिसत आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री मोनालीसा बागल या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. पोस्टरवरील या अभिनेत्रीच्या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधले आहे. रक्ताने माखलेला चेहरा चित्रपटाची रहस्यमय असलेली खोली दर्शवतय. चेहऱ्यावरील जखमा, गळा दाबून घेतलेला जीव अशा या द्विधा मनस्थितीत टाकणाऱ्या पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे.
‘स्वप्निल गोगावले फिल्म्स’ अंतर्गत ‘काकुळ’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वप्निल विजया सहदेव गोगावले यांनी साकारली, सहनिर्माते म्हणून राजीव दत्तात्रय पाटील, सोमा दास यांनी बाजू पाहिली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक सूरज रघुनाथ पडवळ यांनी केले आहे.
मोनालीसासह या चित्रपटात यश डिंबळे, विवेक यादव पाटील, मयूर भोसले हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या थरारक चित्रपटातील गाण्यांचं उदय देशपांडे यांनी संगीत केलं आहे. तर संपूर्ण चित्रपट वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. अशा या हॉरर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आली नसून लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यास सज्ज होणार आहे एवढं नक्की.