स्टार प्रवाहच्या मन धागा धागा जोडते नवा मालिकेत धमाकेदार ट्विस्ट
स्टार प्रवाहची मन धागा धागा जोडते नवा मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखची एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा मयुरी साकारणार आहे. मयुरीच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे.
मयुरी देशमुख एक उत्तम अभिनेत्री आहे. मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिलीच मालिका.
सुखदा या व्यक्तिरेखविषयी सांगताना मयुरी म्हणाली, ‘मी जवळपास सहा वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करतेय. खरं सांगायचं तर खुप उत्सुकता आहे.
शक्यतो भूमिकेत तोच तोच पणा येऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो. सुखदा हे पात्र अतिशय सुंदररित्या लिहिलं गेलं आहे. आयुष्य भरभरुन जगणारी, बडबडी आणि अतिशय सकारात्मक अतिशय ही व्यक्तिरेखा आहे.
या पात्राविषयी ऐकताक्षणीच मी प्रेमात पडले. स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा देखिल पूर्ण होतेय. सुखदाच्या येण्याने सार्थक-आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे पुढच्या भागांमधून उलगडेलच.
तेव्हा पाहायला विसरु नका मन धागा धागा जोडते नवा सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’