सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा !

झी मराठी बहरतेय नव्या अवतारात !

 

झी मराठीने आजवर प्रेक्षकांच्या कौटुंबिक भावना, प्रेम, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे आणि हे नातं आणखी दृढ करण्यासाठी झी मराठी २७ मे २०२४ पासून एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर आली. पुन्हा एकदा झी मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करण्यासाठी आणि चाफ्याचा सुगंध पसरवण्यासाठी सज्ज आहे.

प्रेक्षकांच्या बदलत्या पसंतीसह झी मराठीने आजच्या सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अश्या नवीन कथा आणल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत, ‘जाऊ बाई गावात’ सारख्या नाविन्यपूर्ण रिऍलिटी शोमुळे प्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली. त्यात भर टाकली ती ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे ‘ या नवीन मालिकांनी. लक्षवेधक कथा, आकर्षक सेट, उत्तम निर्मितीमूल्य, उत्तम कलाकारांची फौज या सर्वांमुळे प्रेक्षकांना ह्या मालिका आपल्या वाटू लागल्या आहेत. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे, सर्वत्र क्रिकेटचं वातावरण असतानाही, झी मराठीने आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवलीये आणि क्रिकेटच्या मॅचेसना प्रेम मिळत असतानाही याकाळात झी मराठीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं.

*’पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि म्हणूनच झी मराठीच्या नव्या रुपात भर टाकण्यासाठी नवीन आणि प्रगल्भ अनुभव देणाऱ्या आणखी दोन मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ आणि ‘ड्रामा ज्युनियर्स’ ह्या झी मराठी कुटुंबात लवकरच दाखल होणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका झी मराठी!!*

Leave a Reply