अभिनेत्री राधासागर हिच्या घरात आला खास पाहुणा
आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री राधा सागर हिने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.
त्यानंतर आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी तिने एक पोस्ट शेअर करत तिला मुलगा झाला असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना शेअर केली.
तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तसेच अनेक मराठी सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.