सुरेश वाडकर यांचा स्वरसाज लाभलेले ‘ पौर्णिमेचा शुभ्र चंद्र ‘हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेमाची अशी आखीव रेखीव व्याख्या नाही तरीही, ती भावना निराळीच. अशीच प्रेमाची अनोखी भाषा सांगणारे ‘ पौर्णिमेचा शुभ्र चंद्र ‘ हे प्रेम गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एक चित्रकार एका सुंदर स्त्रीचे चित्र काढतो. पण जेव्हा चित्रामधील लावण्यवती प्रत्यक्षात अवतरते तेव्हा नेमके काय घडते याचे चित्रण ‘पौर्णिमेचा शुभ्र चंद्र ‘ या गाण्यात करण्यात आले आहे. सुनीता मुलकलवार लिखित या गीताला अभिजित जोशी यांनी संगीत दिले आहे तर, प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांचा स्वरसाज या गीताला लाभला आहे. या गीताचे दिग्दर्शन दुर्गेश हरावडे तर, नृत्यदिग्दर्शन मीरा जोशी आणि तुषार बल्लाळ यांनी केले आहे. या सुमधुर गीताचे छायाचित्रण किआन चव्हाण यांनी केले आहे.
अनेक मालिका व चित्रपटांमधून नावलौकिक मिळवलेले रुचिरा जाधव व आदित्य दुर्वे या दोघांवर हे गाणे चित्रित केले आहे. केदार जोशी आणि पूर्वा जोशी यांच्या सुमन एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात एखादा कलाकार त्याच्या कलाकृतीशी एकरूप होतो आणि त्यानंतर घडलेल्या घटना या उत्तमरित्या मांडण्यात आल्या आहेत. ‘ माझ्या नवऱ्याची बायको ‘ या मराठी मालिकेतून रुचिराने तर, ‘ दिल दोस्ती दुनियादारी ‘ या मालिकेतून आदित्यने मराठी सिने सृष्टीमध्ये पदार्पण केले. सुरेश वाडकर यांचा आवाज, रुचिरा व आदित्य या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात तिळमात्र शंका नाही.
गाण्याची लिंक – पुर्ण गाणं पाहण्यासाठी Suman music या youtube चॅनेलला भेट द्या