‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री
‘आई कुठे काय करते’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेमुळे मालिकेतील कलाकारांना एक नवी ओळख मिळाली आहे.ही मालिका सतत टीआरपीच्या शर्यतीत पुढे असते. मालिकेत दररोज काही ना काही रंजक घडामोडी घडत असतात.सध्या मालिकेत ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्या निमित्ताने इशा हिने खूप सारी महागडी खरेदी केली आहे. तसेच अरूंधती आणि अनिश याच्या आईने हिने देखील खरेदी केली आहे.
आई कुठे काय करते ही मालिका मालिकेत येणाऱ्या वेगवेगळ्या ट्विस्ट मुळे नेहमीच चर्चेत असतें. नुकताच प्रदर्शित केलेल्या प्रोमो मध्ये आपल्याला पहिला मिळणारं आहे की इशा साखरपुडा धुमधडाक्यात साजरा होतो आहे.या कार्यक्रमात अनिरुद्ध एक मोठी announcement करणार आहे आणि ती म्हणजे अनिरूद्ध आशुतोष यांची बहीण वीणा हिच्यासोबत नविन बिझनेस चालू करणारं आहे.या ट्विस्टच्या निमित्ताने मालिकेत वीणा या पात्राची एंट्री होणार आहे.
आणि या निमित्ताने वीणा हे पात्र अभिनेत्री खुशबू तावडेची साकारणार आहे. खुशबूची भूमिका सकारात्मक आहे की नकारात्मक याबाबत अद्याप समजलं नाही. आता वीणा हिच्या येण्याने देशमुख आणि केळकर यांच्या कुटुंबात काय नवीन वादळं निर्माण होईल हे येत्या काही भागात पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.
खुशबू ही गेली अनेक वर्ष मराठी मालिका विश्वात काम करत आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचा स्वतंत्र असा fan base आहे.तिने ‘आम्ही दोघी’ या मालिकेत मीराची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने ‘तेरे बिन’ या हिंदी मालिकेत नंदिनीची भूमिका देखील साकारली होती.
इतकंच नाही तर तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तिने बुलबुल ही भूमिका देखील साकारली होती. सध्या खुशबू ‘मेरे साई’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
आई कुठे काय करते या मालिकेत विणा हिंच्या येण्याने काही फरक पडेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.