राघवच्या घरी होणार का रमाचा अनपेक्षित गृहप्रवेश ? रमा राघव महा रविवार एका तासाचा विशेष भाग कलर्स मराठीवर …
मुंबई ७ एप्रिल, २०२३ :
रमा राघव मालिका सुरू झाल्यापासून मालिकेत अनेक रंजक घटना बघायला मिळाल्या. मग ते खट्याळ रमाने राघवला जेरीस आणण्यासाठी केलेल्या गंमती जमती असो किंवा त्याला धडा शिकवावा या उद्देशातून त्याला दिलेला पण तिच्यावरच उलटलेला त्रास असो … प्रेक्षकांना हे सगळंच खूप आवडलं त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या राघवने त्या सगळ्या गोष्टी अतिशय संयमाने आणि समजूतदारपणे हाताळल्या असं म्हणायला हरकत नाही…विशेष म्हणजे या दोघांची खट्याळ प्रेमाची तिखटगोड गोष्ट ही हळूहळू बहरू लागली आहे. पण आता मात्र मालिका रंजक वळणावर येणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये रमा आपलं सामान घेऊन राघवच्या घरी येताना दिसतं आहे… तिच्या वडिलांची तशी इच्छाच आहे की रमावर चांगले संस्कार होण्यासाठी ते रमाला राघवच्या घरी राहायला पाठवणार आहेत. राघवच्या घरी खरंच होणार का रमाचा अनपेक्षित गृहप्रवेश ? आणि रमा यासाठी का बरं तयार झाली असावी ? रमाच्या येण्याने राघव आणि रमाच्या नात्याला कुठलं वेगळं वळण मिळेल ? राघवच्या घरातील मंडळी रमाचा राग करतात त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच रमाने ठेवला नाहीये …
मागे ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्या विसरणे राघवच्या कुटुंबाला अशक्य आहे. आता तिच्या येण्याने राघवच्या घरातील लोकं रमाला धडा शिकवायला मागे पुढे बघणार नाहीत यात शंका नाही… पण या सगळ्यात रमाला आपलेपणा, माया, संस्कार यांची शिदोरी मिळणार आहे. ती कसं यांना आपलंस करेल ? काय काय घडेल जाणून घेण्यासाठी बघा रमा राघव मालिकेचा महा रविवार विशेष भाग ९ एप्रिल रोजी फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.