अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला ‘युवा पुरस्कार’ प्रदान,खास पोस्ट शेअर करत सांगितली ही गोड बातमी
अभिनेत्री प्राजक्ता माळी हि एक उत्तम अभिनेत्री ,डान्सर,आणि निवेदिका देखील आहे. ती सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या रोजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिचा फॅन बेस देखील मोठा आहे. काही दिवसापूर्वी तिने तिचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड चालू केला आहे. आणि याला तिच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या प्राजक्ता माळी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे,नुकतेच तिने एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली. पोस्ट शेअर करत प्राजक्ता माळी म्हणते “परवा ‘सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचा’; “युवा पुरस्कार” मिळाला. पुणे शहरात वाढले, सगळं शिक्षण पुण्यात झालं, पुणे विद्यापीठातून पदवीधर झाले. त्यामुळे घरातून शाबासकी मिळाल्याची भावना आहे. ह्यात “ललित कला केंद्र गुरुकुल- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ”, माझे नृत्य गुरूद्वय- गुरू श्रीमती स्वातीताई दातार, गुरू श्री. परिमल फडके, माझं कुटूंब, माझी प्राथमिक शाळा- समर्थ विद्यालय, माध्यमिक शाळा- दामले प्रशाला- महाराष्ट्र मंडळ, पुणे शहर, प्राजक्तप्रभा, प्राजक्तराज, आतापर्यंत केलेल्या सगळ्या मालिका, चित्रपट, विशेषकरून महाराष्ट्राची हास्यजत्रा, Art of living foundation- श्री श्री रवीशंकरजी आणि “माझा अत्यंत प्रामाणिक असा प्रेक्षकवर्ग” ह्या सगळ्यांचा सहभाग आहे. विद्यापीठाचे, ललित कला केंद्राचे प्रवीण भोळे सर व परिमल सर ह्यांचे विशेष आभार. सरतेशेवटी.., माझ्याकडून तुमचं जास्तीत जास्त मनोरंजन होवो, तुमची सेवा घडो; हीच ईश्वराचरणी प्रार्थना.”
तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी कॉमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे