दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “तमाशा LIVE” आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला !!
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ज्या चित्रपटाची चर्चा चालू आहे तो म्हणजे तमाशा लाईव्ह (Tamasha Live). या चित्रपटाच्या असलेल्या अनोख्या नावापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहिला मिळाली.असा हा दमदार स्टारकास्ट असणारा चित्रपट आजपासून म्हणजे १४ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. न्यूज चॅनेल काम करत असताना एकमेकांपेक्षा वरचढ होण्याची धडपड ,”ब्रेकिंग न्यूज” साठीची धडपड आणि बातमी मागे असणारी खरी बातमी या सर्व गोष्टी या चित्रपटात अधोरेखित केल्या आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना सोनाली, सचित, सिद्धार्थ यांना गायकाच्या भूमिकेतही अनुभवता येणार आहे.प्रेक्षकांना चित्रपटात काही विशिष्ट शैलीची गाणी ऐकायला मिळणार आहेत. रॅप, रोमँटिक असे गाण्यांचे विविध प्रकार यात असून नृत्य यात दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.
‘तमाशा लाईव्ह’ मध्ये सोनाली कुलकर्णी,सचित पाटील,सिद्धार्थ जाधव,पुष्कर जोग,हेमांगी कवी नागेश भोसले मृणाल देशपांडे मनमीत पेम आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची तर दिग्दर्शन आणि पटकथा संजय जाधव यांचे आहे.चित्रपटासाठी अरविंद जगताप यांनी संवाद लिहले आहेत तर अमितराज आणि पंकज पडघम यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाला साजेशी अशी सर्व गाणी क्षितिज पटवर्धन यांनी लिहली आहेत. प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे.सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
अश्या वेगळ्या विषयाच्या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतो हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.