फ्रायडे रिलीज : बहुचर्चित थरारपट ‘वाय’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला !!!

गेल्या काही दिवसापासून ज्या मराठी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे तो ‘वाय’ चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे सर्वत्र होणारे जोरदार प्रमोशन,थरारक टीझर आणि दमदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली होती. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मुक्ता बर्वे या चित्रपटात एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटनांचा शोध मुक्ता यात घेताना दिसणार आहे.

कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे.या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले असणार आहेत. पटकथा व संवाद अजित वाडीकर ,स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.

Leave a Reply