मन उडु उडु झालं : इंद्रा-दीपूच्या नात्याविषयी कळेल का मालतीला ?
झी मराठीवरील ‘मन उडु उडु झालं’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. इंद्रा-दीपूच्या नात्याची कसोटी सध्या मालिकेत पाहायला मिळते आहे. सानिकाच्या लग्नाचे सत्य समजल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मनोहर हतबल होतो व अशातच त्याला हृदयविकाराचा झटका येतो. सध्या मनोहर इस्पितळात दाखल असून त्यावर उपचार सुरु आहेत. अशातच इस्पितळाचे बिल भरण्यासाठी मालती तिची माळ मोडून पैशांची सोय करण्याचे दीपूला देते. ती माळ दीपूच्या हातात देताना तिच्या हाताला रंग लागलेला पाहून तिच्या मनात एक शंका येते.
मालतीला इंद्रा-दीपूच्या नात्याविषयी कळेल का? त्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल? ती स्वीकारेल का त्यांचे नाते? अजिंक्य राऊतने इंद्राची तर हृता दुर्गुळेने दीपूची व्यक्तिरेखा साकारली आहे. लवकरच मालिकेत होळी विशेष भाग रंगणार आहे. त्यामुळे येत्या काही भागांमध्ये इंद्रा-दीपू एकमेकांना रंग लावताना पाहायला मिळणार आहे. तुम्हाला इंद्रा-दीपूची जोडी आवडते का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.