‘हा’ अभिनेता करणार ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन !
झी मराठीवर येत्या १८ मार्चपासून ‘बँड बाजा वरात’ हा कार्यक्रम दाखल होतो आहे. या कार्यक्रमाचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हा कार्यक्रम नवविवाहित दाम्पत्यांसाठी असणार आहे. या कार्यक्रमासंदर्भातील एक प्रोमो वाहिनीने नुकताच प्रदर्शित केला आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार असे कोडे प्रेक्षकांना वाहिनीने घातले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक पुष्कराज चिरपुटकर असल्याचे उत्तर दिले आहे. वाहिनीने घातलेल्या कोड्यामुळे प्रेक्षकांची या कार्यक्रमाविषयीची उत्सुकता वाढली आहे. झी मराठीवरचा हा आगळा-वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल का हे आपल्याला लवकरच कळेल.

Leave a Reply