झी मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार ‘महाएपिसोड’ची मेजवानी !

झी मराठीवरील सर्वच मालिका प्रेक्षक पसंतीस उतरतात. सध्या झी मराठीवरील ‘मन झालं बाजींद’. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!’, ‘देवमाणूस २’ या मालिका प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरत आहेत. या तिन्ही मालिकांमध्ये आगामी काळात नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. येत्या रविवारी म्हणजेच २० फेब्रुवारीला या तिन्ही मालिकांचे महाएपिसोड प्रदर्शित होणार आहेत. त्या संदर्भातील व्हिडीओही झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘मन झालं बाजींद’ मालिकेत कृष्णाला तिचं लग्न रायासोबत का लावण्यात आले हे सत्य समजते. त्यामुळे संतापलेली कृष्णा विधात्यांचे घर सोडून जाते असे मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत सिद्धार्थ अदितीला भावनिक बाबींमध्ये अडकवत त्याच्या मनाप्रमाणे तिला वागण्यास सांगतो. त्यामुळे अदिती घरातील सर्व तिचा तिरस्कार करतील असे वागण्यास सुरुवात करते. त्यामुळे चिडलेल्या देशमुख महिला तिला घराबाहेर काढतात. मात्र मोठ्या बाई म्हणजेच सुमित्रा तिची ठामपणे बाजू घेतात. त्यामुळे सिद्धार्थचे सत्य देशमुख कुटुंबासमोर येणार का? हेही आपल्याला रविवारच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘देवमाणूस २’मध्ये जयसिंगच्या पैशांसाठी अजितकुमार नीलमला त्याच्या जाळ्यात ओढतो. सर्व काही अजितकुमारच्या योजनेप्रमाणे घडत असतानाच नीलमचा खून होतो. त्यामुळे अजितकुमार गोंधळतो. अशातच डिंपल त्याच्यासमोर मदतीचा हात पुढे करते. अजितकुमार स्वीकारेल का डिंपलची मदत? अजितकुमारला जाळ्यात अडकवण्यासाठी डिंपल आणखी कोणता नवा डाव आखेल? हेही पाहणे औसुक्याचे ठरेल.

Leave a Reply