रयतेच्या राजाची गौरव गाथा मांडणारे ‘सेर सिवराज है’ हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला !
रयतेचा राजा असे म्हटले की समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव नजरेसमोर येते. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार ३९२वी जयंती आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक दिव्य कुमार महाराजांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे गुणगान ‘सेर सिवराज है’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे. हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.
महाराजांचे गुणगान गाणारे आणि महाराजांच्या साम्राज्यातले महा कविभूषण यांच्या काव्यावर आधारित रचलेल्या या गीताची प्रस्तुती ‘मानस मराठी’ केली असून गीताची निर्मिती असून संजय पटेल यांनी केली आहे. दिव्य कुमारने अनेक नावाजलेल्या हिंदी सिनेमातील गाणी गायली असून ‘ ‘फत्तेशिकस्त’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या अनेक मराठी सिनेमातील गाणी गाणी गायली आहेत. दिव्य कुमारने शिवाजी महाराजांवरील हे गीत प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशश्वी होईल यात तिळमात्र शंका नाही.