फ्रायडे रिलीज : येत्या शुक्रवारी घ्या ‘पावनखिंडी’चा अनुभव !
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. बाजीप्रभू देशपांडेचा पावनखिंडीमधील पराक्रम प्रेक्षकांना या सिनेमाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावर या ट्रेलरने धुमाकूळ घातला होता. अनेक दिग्गज कलाकार आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
बाजीप्रभू, फुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला. या सिनेमात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अक्षय वाघमारे, शिवराज वायचळ, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, सुरभी भावे, दीप्ती केतकर, विक्रम गायकवाड, सुनील जाधव, वैभव मांगले, हरीश दुधाडे हे कलाकार आपल्याला विविध ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
येत्या १८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच अधिराज्य गाजवेल यात शंका नाही.