दीपू-इंद्राच्या येणार दुरावा ?
झी मराठीवरील ‘मन उडु उडु झालं’ मालिकेतील इंद्रा-दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्या दोघांनी एकेमकांना प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचे बहरत जाते आहे. मात्र लवकरच दीपू-इंद्राच्या नात्यात दुरावा येणार असल्याची चर्चा रंगली आहे. दीपू मनोहरची मुलगी असल्याचे सत्य इंद्राला धक्का बसतो हे आपण रविवारच्या महाएपिसोडमध्ये पाहिले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपूच्या खोटे बोलण्यामुळेदुखावलेला इंद्रा तिच्यासोबतचे नाते तोडतो. त्यामुळे दोघेही नात्यात आलेल्या दुराव्यामुळे अस्वस्थ होतात असे लवकरच मालिकेत दाखवण्यात येणार आहे.
दीपू व इंद्राच्या नात्यात येणारा दुरावा त्यांच्या आयुष्यात कोणते वळण घेऊन येईल? मनोहरला इंद्रा-दीपूच्या प्रेमाविषयी कळेल का? इंद्रा माफ करेल का दीपूला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहेत.