संदीप पाठक व भाऊ कदम ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र !
संदीप पाठक व भाऊ कदम यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. हे दोघे अभिनेते ‘बेनवाड’ या हॉरर कॉमेडी सिनेमात पाहायला मिळणार आहेत. झी टॉकीज ओरिजनलच्या या सिनेमात बेनवाड या गावात राहणाऱ्या रंज्या व संज्या या दोन भावांची कथा पाहायला मिळणार आहे.
सुमित संघमित्र दिग्दर्शित या सिनेमात भाऊ व संदीपसह कृतिका तुळसकर, शुभांगी भुजबळ, विजय पाटकर, संतोष शिंदे, रुक्मिणी सुतार, माधव अभ्यंकर, रमेश वाणी हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत.
हा सिनेमा येत्या १३ फेब्रुवारीला झी टॉकीजवर दुपारी १२:३० व सायंकाळी ६:०० वाजता प्रसारित होणार आहे. भाऊ व संदीप हे या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना हसवण्यात नक्कीच यशस्वी यात शंका नाही.