‘देवमाणूस २’ मालिकेत अजितकुमार अडकणार स्वतःच्याच सापळ्यात !
झी मराठीवरील ‘देवमाणूस २’ ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यात त्यांना म्हणावे तितके यश मिळत नसल्याचेही दिसून येते आहे. त्यामुळेच की काय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या मालिकेत लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नीलम गरोदर असल्याचे कळताच अजितकुमार तिला ठार मारण्याचे ठरवतो व त्यानुसार तो एक योजना आखतो. मात्र ठरलेल्या ठिकाणी भेटण्याऐवजी नीलम त्याला हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावते असे काही कथानक मालिकेत दाखवण्यात आले आहे.
झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एक प्रोमोमध्ये, अजितकुमार नीलमला मारणार इतक्यातच ती तिला त्याच्याशी लग्न करायचे नसल्याचे सांगते. त्यामुळे तो खूश होतो. मात्र नंतर तिचा बाथटबमधील मृतदेह पाहून त्याला धक्का बसतो व तो त्यामुळे तो चिंतीत होतो असे दाखवण्यात आले आहे. हा प्रोमो पाहिल्यावर आतापर्यंत इतरांसाठी सापळा रचणाऱ्या अजितकुमारसाठीच कुणीतरी सापळा रचल्याचे लक्षात येते. अजितकुमारला अडकवणारी व्यक्ती कोण असेल? डिंपल की आणखी कुणी दुसरी व्यक्ती? या प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. या नव्या ट्विटमुळे मालिकेमध्ये रंजक वळण येणार हे मात्र नक्की! ‘देवमाणूस २’ मालिकेतील कोणते पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.