ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !
नवीन वर्षात अनेक नव्या सिनेमांची घोषणा करण्यात आली आहे. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावरील सिनेमाचीही नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. अशातच निळू फुले यांच्यावर आधारित सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती एका विशेष सुत्राकडून मिळाली आहे. सध्या या सिनेमावर काम सुरु असून टिप्सी इंडस्ट्रीचे निर्माते रमेश तौरानी यांनी सिनेमाचे अधिकार विकत घेतले असल्याचीही माहिती मिळाली आहे.
निळू फुलेंचा स्वातंत्र्य सैनिक, अभिनेता व एक सामाजिक कार्यकर्ता असा प्रवास सिनेमात दाखवणार आहेत. रमेश यांनी याआधी ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ हा सिनेमा राजकुमार संतोषी यांच्यासोबत मिळून बनवली होती. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या सिनेमापासून निळू फुलेंच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. निळू फुलेंचे वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले.
त्यांनी अनेक वर्ष आपल्या अभिनयनाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यामुळे या दिग्गज अभिनेत्याचा सिनेमा पाहण्यास प्रेक्षक आतुर असणार हे मात्र नक्की!