‘देवमाणूस २’ मालिकेत येणार रंजक वळण ! अजितकुमार करणार डिंपलचा खून ?
‘देवमाणूस’ या मालिकेला लोकप्रियता मिळाल्यावर काही महिन्यांनी या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अजितकुमार उर्फ देवीसिंग उर्फ नटवरची व्यक्तिरेखा किरण गायकवाडने साकारली असून डिंपलची व्यक्तिरेखा अस्मिता देशमुख साकारत आहे. लवकरच या मालिकेत एक रंजक वळण पाहायला मिळणार असून प्रेक्षकही त्यासाठी आतुर आहेत.
अजितकुमारचे पितळ सर्वांसमोर उघड करण्यासाठी डिंपल त्याच्यावर लक्ष ठेवते व त्यासाठी त्याच्याविरोधात काही पुरावे सापडतात का याचाही शोध घेते. दरम्यान, मध्यरात्री अजितकुमार वाड्याबाहेर पडल्याचे कळताच डिंपलही त्याचा पाठलाग करते. मात्र अजितकुमारने हे डिंपलसाठी आखलेला डाव असल्याने ती त्यात अडकते. ती बेसावध असतानाच अजितकुमार तिचा गळा दाबतो, अशा आशयाचा एक व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजितकुमारचा पाठलाग डिंपलच्या गळ्याशी येणार का? डिंपलचाही खून अजितकुमार करणार का? डिंपल मालिकेत दिसणार की नाही? असे अनेक प्रश्नही प्रेक्षकांना पडले आहेत.