अभिनेत्री सुरेखा कुडची दिसणार या नव्या मालिकेत !
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या सुरेखा कुडची लवकरच एका मालिकेत पाहायला मिळणार आहेत. सुरेखा यांनी स्वतःच याविषयीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
View this post on Instagram
‘लवकरच येतेय तुम्हा सगळ्यांना भेटायला…नव्या भूमिकेत’ अशा आशयाची पोस्ट सुरेखा यांनी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलर्स मराठीवर नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ या मालिकेत सुरेखा कुडची दिसणार आहेत.
View this post on Instagram
त्यामुळे सुरेखा यांचे चाहते त्यांना नवीन भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत.