झी मराठीवरील ‘या’ मालिकेच्या जागी येणार ‘ही’ नवी मालिका !
झी मराठीवर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच ओमकार-स्वीटूचे लग्न झाले असून ते आपल्या संसाराला लागल्याचे पाहायला मिळते आहे. त्यासोबतच शकूने स्वीटूसाठी केलेला निश्चय ती मालविकाला सांगते. मालिका सध्या रंगतदार वळणावर आलेली असतानाच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा मालिकाविश्वात रंगली आहे. त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’च्या जागी ‘सत्यवान सावित्री’ ही मालिका सुरु होणार असल्याचीही चर्चा सध्या सुरु आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये सध्या ओमकार-स्वीटूचा रोमान्स पाहायला मिळतोय. त्या दोघांना असं एकत्र पाहून मालविकाचा जळफळाट होतो व ती या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्याने करते. त्यामुळे ह्या मालिकेचा शेवट काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.