‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘हा’ कलाकार झालाय ‘मजनू’
झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून नितीश चव्हाण हा अभिनेता घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेल्या ‘अज्या’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नितीश लवकरच एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मजनू’ असे या सिनेमाचे नाव असून या सिनेमाचे पोस्टर व मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित व सोनाई क्रिएशन निर्मित या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
नितीश चव्हाणसोबतच या सिनेमात रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे, माधवी जुवेकर, अदिती सारंगधर, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे प्रणव रावराणे, अरबाज शेख हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘मजनू’ सिनेमाच्या पोस्टरवर घोड्यांच्या मधोमध धावताना नितीश दिसतोय तर रोहन व स्वेतलाना एकमेकांसोबत दिसत आहेत. पी. शंकरम, सचिन अवघडे, साजन-विशाल यांनी सिनेमाला संगीतबद्ध केले असून सलमान अली, संदीप उबाळे, वि%