‘ती परत आलीये’ मालिकेत लवकरच येणार मुखवटाधारीचा चेहरा समोर !
झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. नुकतेच या मालिकेने १०० भाग पूर्ण केले असून आता ही मलिका शेवटच्या अशा रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. ‘ती परत आलीये’ या मालिकेने ती कोण असावी असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण तर केलाच पण त्यासोबतच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यातही यश मिळवले.
मात्र प्रेक्षकांच्या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार असून मुखवटाधारी मागचा चेहरा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मित्रांच्या समूहापैकी आता फक्त सायली, विकी व सतेज उरले असल्यामुळे पुढे काय घडणार यांची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्यासोबतच ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चाही मालिका विश्वात रंगते आहे. या मालिकेच्या जागी बहुप्रतिक्षित ‘देवमाणूस २’ ही मालिका पाहायला मिळणार आहे अशीही शक्यता आहे.