सोनाली कुलकर्णी व पुष्कर जोग पुन्हा एकत्र झळकणार ‘या’ चित्रपटात
‘ती आणि ती’, ‘तमाशा लाईव्ह’ या सिनेमांनंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अभिनेता पुष्कर जोग लवकरच एका चित्रपटात एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. ‘व्हिक्टोरिया’ असे या सिनेमाचे नाव असून या सिनेमाची संपूर्ण टीम सध्या स्कॉटलंडमध्ये चित्रीकरणासाठी एकत्र जमली आहे. आनंद पंडित मोशन पिचर्स एल एल पी आणि गुजबम्प्स एंटरटेनमेंट या निर्मितीसंस्थेअंतर्गत ‘व्हिक्टोरिया’ सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे.
नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला असून या सिनेमात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. त्यासोबतच हीरा सोहल नवोदित अभिनेत्रीही या सिनेमातून सिनेक्षेत्रात पदार्पण करणार आहे. आनंद पंडित, रूपा पंडित व पुष्कर जोग सिनेमाचे निर्माते असून जीत अशोक व विराजस कुलकर्णी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.
आनंद पंडित व पुष्कर जोग यांच्या ‘ती आणि ती’ आणि ‘वेल डन बेबी’ या सिनेमांप्रमाणेच ‘व्हिक्टोरिया’ हा सिनेमा तितकेच यश मिळवेल का हे लवकरच कळेल