फ्रायडे रिलीज : ‘विजेता’ व ‘डार्लिंग’ हे सिनेमे करणार या शुक्रवारी मनोरंजन
चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर हळूहळू चांगल्या धाटणीचे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजेच १० डिसेंबरला ‘विजेता’ व ‘डार्लिंग’ असे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. समीर पाटील दिग्दर्शित ‘डार्लिंग’ या सिनेमात प्रथमेश परब, निखिल चव्हाण, रितिका क्षोत्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान गाजला होता.
या सिनेमाची गाणीही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत. हलका-फुलका विषय असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही. त्याचबरोबर सुबोध भावे, पूजा सावंत, प्रीतम कागणे, माधव देवचक्के व सुशांत शेलार अशा कसलेल्या कलाकारांचा ‘विजेता’ हा सिनेमा. क्रीडा क्षेत्रावर आधारित असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन अमोल कागणे यांनी केले आहे.
या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची विशेष पसंती लाभली. ‘विजेता’ व ‘डार्लिंग’ या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.